स्वागतकक्ष arrow मराठी साहित्य arrow लेख arrow व्यवसाय धर्म वाढवावा
व्यवसाय धर्म वाढवावा पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 
      

उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी ही परिस्थिती येण्यासाठी उद्योजकाला श्रमदेवीची किती कठोर उपासना करावी लागते हे `जावे ज्याच्या वंशा' तेव्हाच कळे. सध्याच्या औद्योगिक मंदीच्या आणि जागतिकीकरणाच्या लाटेत उद्योजकांना अनेक अडचणींना व स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. लहान मोठ्या उद्योजकांना एकत्र येण्यासाठी एखाद्या व्यासपीठाची गरज तीव्रतेने भासू लागली आहे. उद्योजकांना एकमेकांशी सहकार आणि सहजीवन यासाठी दोन उत्तम व्यासपीठे पुण्यात उपलब्ध झाली आहेत. सॅटर्डे क्लब :-
`उत्तम नोकरी कनिष्ठ व्यापार' ही आम्हा मराठी माणसांची मानसिकता बनली आहे. लहानपणापासून मुलांच्या मनावर `चांगला शिक, मोठ्या पगाराची नोकरी मिळव' हाच संस्कार घडविला जातो. सध्याच्या मंदीच्या दिवसांत उच्च शिक्षण घेऊनही चांगल्या नोकऱ्या मिळणे दुरापास्त झाले आहे; परंतु तरीही स्वतंत्र व्यवसाय मग तो कितीही छोटा / मोठा असो, करण्याची मराठी माणसाची इच्छा नसते.

`कौनबनेगा करोडपती' या कार्यक्रमाला मिळालेले अफाट यश हेच दाखविते की अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाचेसुद्धा `करोडपती' बनण्याचे स्वप्न असते; परंतु स्वप्न सत्यात येण्यासाठी प्रयत्न करण्यात मराठी माणूस कमी पडतो. यासाठी आवश्यक असणारी मानसिकता आणि मार्गदर्शनाचा अभाव ही खरी दुखणी आहेत. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मुंबईचे एक प्रसिद्ध उद्योगपती माधवराव भिडे यांनी एक अभिनव उपक्रम चालू केला आहे, तो म्हणजे `सॅटर्डे क्लब'.

केटरिंगपासून कॉम्प्युटरपर्यंत आणि वर्कशॉपपासून ते केंद्र इथपर्यंत कुठल्याही क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या मराठी मंडळींना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ आहे. उद्योग व्यवसायातल्या ज्या मराठी मंडळींना आपली व पर्यायाने संपूर्ण समाजाची आर्थिक उन्नती साधायची आहे, असे २५-३० जण एकत्र येऊन आर्थिक विषयाला वाहिलेले हे मंडळ सुरू करण्यात सिंहाचा वाटा उचलत आहेत, या मंडळात सभासदत्वासाठी वयाची अट नाही. महिन्यातल्या एका शनिवारी एकत्र येऊन आर्थिक विषय व व्यवसायाच्या उपलब्ध संधी यावर चर्चा होते. विविध व्यवसायातील मंडळी एकत्र येण्यामुळे सर्वांचा निकट परिचय होतो. `सहजीवन आणि सहकार' या दोन तत्वांवर आधारित चर्चा मंडळात होते. सभासदांना व्यवसायवृद्धीमध्ये एकमेकांच्या ओळखीचा फायदा होऊन व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. मराठी माणूस `खेकड्याच्या' वृत्तीचा आहे आणि तो दुसऱ्या मराठी माणसाला मदत करीत नाही, उलट त्याचे पाय ओढतो. हा मराठी माणसावर नेहमी होणारा आरोप येथे खोटा पाडला जातो. याक्लबचे ब्रीदच मुळी, `मराठा तितुका मेळवावा । व्यवसायधर्म वाढवावा ।' हे आहे.

गेल्या वर्षी मुंबईत या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. आज दादर, वाशी, गोरेगाव, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक इ. ठिकाणी हे सॅटर्डे क्लब उत्तमरीत्या कार्यरत आहेत. इतकेच नाही तर मद्रास, बंगळूर, हैदराबाद, बडोदा, लंडन या ठिकाणाहूनसुद्धा या संकल्पनेला मराठी माणसांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि काही दिवसांतच या सर्व ठिकाणी सॅटर्डे क्लब चालू होतील. पुण्यातही नुकतीच या क्लबची सुरवात झाली आहे. पुण्याचा विस्तार लक्षात घेता किमान ८ ते १० क्लब विविध भागांत सुरू होणे गरजेचे आहे.

- विवेक वेलणकर
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color