स्वागतकक्ष
स्वागतकक्ष ई-मेल
अणुकरारास पाठिंबा
भारत सरकारने प्रस्तावित केलेला अमेरिकेबरोबरचा अणुकरार हा भारताच्या सध्याच्या व भावी ऊर्जा समस्येवर योग्य उपाय आहे. न्युक्लिअर एनर्जी पासून वीजनिर्मिती ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने देखील आता अधिक सुरक्षित झाली आहे. यापूर्वी चीनने असाच एक करार अमेरिकेसोबत केला आहे. आपल्या या अणुकराराला रशियानेही पाठींबा दिला आहे. रशियाच्या मते हा अणुकरार भारतासाठी उपयुक्त असून करारानंतर रशिया अधिक उघडपणे भारताची मदत करु शकेल. रशिया आंतरराष्ट्रीय नियमांनी बांधला गेला आहे जर हा करार झाला तर भारताला मदत पुरवणे सोपे होईल. नागरी अणुभट्ट्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा प्राधिकरणाच्या (आयएईए) निरीक्षणाखाली असतानाही इंधनावर फेरप्रक्रिया करण्याची मुभा भारताला देण्यात आली आहे. सर्व तंत्रज्ञ, समाजसुधारक व राजकीय पक्ष यांनी भारताच्या उज्वल भविष्यासाठी या करारास पाठिंबा द्यावा असे ज्ञानदीपला वाटते. याविषयी अधिक माहिती ज्ञानदीपच्या एन्व्हीस या संकेतस्थळावर वाचा.
ज्ञानदीपची संस्कृतदीपिका आता युनिकोड अक्षरसंचात परिवर्तित
. मराठीतून संस्कृत भाषा शिकण्याची उत्तम सोय. संस्कृत शिक्षक, अभ्यासक व संस्कृत शिक्षण संस्था यांची माहिती व लेख यांना प्रसिद्धी
अभिनंदनीय निर्णय
८२वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को येथे करण्याचा अभिनंदनीय निर्णय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. या निर्णयावर बरीच टीका होत असली तरी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मराठीला मानाचे स्थान मिळण्यासाठी महामंडळाने एक महत्वाचे व धाडसी पाऊल टाकले आहे असे ज्ञानदीपला वाटते. यापुढे जाऊन मराठीतील साहित्य इंग्रजीसह अन्य भाषांत व अन्य भाषांतील साहित्य मराठी भाषेत आणण्याचा उपक्रम सुरू करून परदेशस्थ मराठी बांधवांना त्यात सहभागी करून घ्यावे असे वाटते. सांगलीतील संमेलन प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद ज्ञानदीपच्या साहित्यसागरसांगली या संकेतस्थळामुळे हजारो परदेशस्थ मराठी बांधवांना घेता आला. आता तसाच अनुभव महाराष्ट्रातील जनतेला संकेतस्थळाद्वारे करून देता येईल.ज्ञानदीप याबाबतीत महामंडळास सर्व प्रकारचे साहाय्य करण्यास तयार आहे.
मराठी लिहिण्यासाठी गमभन संगणक प्रणाली
गमभन हे ओंकार जोशी यांनी विकसित केलेली संगणक प्रणाली आता नव्या सुधारित स्वरुपात प्रसिद्ध झाली आहे.त्याची माहिती मराठी भाषा या सदरात दिली आहे. मराठी लिहिण्यासाठी केलेल्या संशोधनाबद्दल व सर्वांना ते मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. ओंकार जोशी यांना धन्यवाद.
वालचंद कॉलेज स्थापनेचा इतिहास
वालचंद महाविद्यालय, सांगलीचे संस्थापक कै. धोंडुमामा साठे यांच्या शब्दांत कॉलेज स्थापनेचा इतिहास ज्ञानदीप फौंडेशनच्या संकेतस्थळावर वालचंद हेरिटेज प्रॉजेक्टमध्ये वाचा.

मराठी भाषेतील ज्ञान व मराठी माणसाचे कर्तृत्व यांची जगाला ओळख व्हावी यासाठी ज्ञानदीपने मायमराठीवरील माहितीचा सारांश मराठी न समजणार्‍या लोकांसाठी देण्याचे ठरविले आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मराठी माणूस मागे पडू नये हा या मागचा उद्देश आहे.
* नवीन साहित्य -
इ-प्रकाशनमध्ये एका यक्षाचे अक्षयगान हे संपूर्ण पुस्तक वाचा
व्यक्तिपरिचय(४८)
भक्तिपरंपरा विभागात - मनाचे श्लोक १-२०५,तुकारामाचे अभंग, इतर संतांच्या प्रसिद्ध रचना
* नवा मराठी ब्लॉग विभाग
मराठी ब्लॉग लिहिणार्‍या व्यक्तींनी कृपया आपल्या ब्लॉगवरील मराठी लेखांची शीर्षके, ब्लॉग संकेतस्थळाचा पत्ता आणि आपली थोडक्यात माहिती फोटोसह इ मेलने कळवावी. प्रत्येक ब्लॉग धारकासाठी एक पान देऊन आपल्या माहितीसह लेख (ब्लॉग संकेतस्थळाचा पत्ता देऊन) या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. तसेच संबंधित विभागात त्याचा दुवा देण्यात येईल. यामुळे मायमराठीच्या वाचकांना आपल्या ब्लॉगविषयी माहिती होऊन आपल्या ब्लॉगचे वाचक वाढतील.
अन्य वाचकांना चांगली मराठी ब्लॉगस्थळे माहीत असल्यास त्यांनी आपल्या अभिप्रायासह ती पाठविल्यास त्यास या संकेतस्थळावर प्रसिद्धी देण्यात येईल. त्याविषयी माहिती द्यावी. ही विनंती
* मोफत मार्गदर्शन -
मराठी अक्षरसंच आपल्या संगणकावर कसा स्थापित करायचा, इंटरनेटवर मराठी कसे लिहायचे व आपला लेख वा साहित्य या संकेतस्थळावर प्रसिद्धीसाठी कसे पाठवायचे याचे संपूर्ण मार्गदर्शन ज्ञानदीपतर्फे मोफत केले जाईल. तसेच आपल्या सर्व शंका व्यक्तिश: सोडविण्यात येतील.यासाठी ज्ञानदीपकडे ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा. या पत्त्यावर संपर्क साधावा.
आपण या संधीचा फायदा घ्याल व आपलेही नाव या जागतिक संकेतस्थळावर दाखल कराल अशी आशा आहे.

* मायमराठी म्हणजे मराठी विषयक सर्व काही
मराठी साहित्य - कविता(८), लेख(२२), नाट्यगीते(८ पाने), बालकविता( ६ पाने), साहित्यरत्ने, कथा(१)
मराठी भाषा - मराठी शिका(२), मराठीची गौरवगाथा (२ पाने)
मराठी पुस्तके - सांगावा कवितासंग्रह (५२), पुस्तकपरिचय(९)
महाराष्ट्रदर्शन - किल्ले(८), मंदिरे (२८), निसर्गरम्यस्थळे (५), प्रेक्षणीय स्थळे (६)
मराठी संस्कृती- भक्तीपरंपरा(१), खाद्यपदार्थ(६२), रितीरिवाज(१), मराठी सण(१२)
इ प्रकाशन - गीतरामायण, सांगावा, काव्यदीप, रा. ग. आपटे, एका यक्षाचे अक्षयगान
महत्वाचे लेख -
१. व्यवसायधर्म वाढवावा - विवेक वेलणकर
२. परदेशी जाऊन काय मिळवलं काय गमावलं - जयंत नारळीकर
३. मराठीपण जपण्यासाठी - जयश्री हुपरीकर
सांगावा व काव्यदीप काव्यसंग्रह ध्वनीफिती, गीतरामायण गीते ध्वनीफिती, संस्कृत स्तोत्रे ध्वनीफिती

* * * ज्ञानदीपची नवी भेट * * *

* भाषांतर विभाग
मराठीतील अपार साहित्यसंपदा जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी त्याचे अन्य भाषांत भाषांतर वा रुपांतर होणे आवश्यक आहे.तसेच इतर भाषांतील साहित्याचे मराठीत भाषांतर होणेही आवश्यक आहे. या संकेतस्थळावर या उद्देशाने स्वतंत्र भाषांतर विभाग सुरू करण्यात येत आहे. महाराष्ट्राबाहेर राहणार्‍या मराठी लोकांचे सक्रीय सहकार्य मिळाले तर ते त्यांच्यासकट सर्वांनाच लाभदायक ठरेल.याबाबतीत आपल्या काही सूचना असल्यास ज्ञानदीपकडे ( ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा. )अवश्य कळवाव्यात.ही विनंती.

 
 
 
 

आपले मत

संगणकावर मराठी लिहिणे सोपे आहे.
 
शासन मराठीच्या वापराबाबत उदासीन आहे.
 
जागतिकीकरणाकडे मराठी माणसाचे दुर्लक्ष होत आहे.
 

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color