परिसंवाद - मनोरंजनाची माध्य

( सौजन्य - इसकाळ न्यूज सर्व्हीस)
"आजची मनोरंजनाची माध्यमे कलेचा ग्राहक म्हणून विचार करतात. त्यामुळे या माध्यमांतून तयार होणारी अभिरुचीही सवंग बनली आहे,' असा सूर पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात आज (रविवारी) व्यक्त झाला.
"आजची मनोरंजनाची माध्यमे आणि अभिरूची' या विषयावर परिसंवादात प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, मीना गोखले, अजित दळवी, अरूण प्रभुणे, विद्या देवधर आणि अभिनेत्री अश्‍विनी भावे सहभाही होते. अध्यक्षस्थानी डॉ. वि. भा. देशपांडे होते.
"बाजारपेठीय संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या माध्यमांमुळे अभिरूची संपन्न कशी होणार, ' असा सवाल खांडगे यांनी उपस्थित केला. "उच्च मध्यम वर्गीय जाणिवांमध्येच ही माध्यमे घुटमळत आहेत. या वर्गाचा अहंगंड आ णि पराभूत मनोवृत्तीतून माध्यमे चंगळवादी बनली आहेत. ती सामाजिक प रिवर्तनाला विरोधाचे काम करीत आहेत,' अशी टीका गोखले यांनी केली. चौगुले यांनी अभिजन वर्गाच्या सुरक्षिततावादी प्रवृत्तीवर टीका केली. अश्‍विनी भावे यांनी टीव्ही मालिकांविषयी नकारात्मक मत नोंदवले. देवधर यांनी लोकांना वास्तव हवे आहे, असे सांगितले.
समकालीन मराठी साहित्य...
"अभिजन वर्गाने त्यांचे आयुष्य उपेक्षित वर्गाबरोबर शेअर केलेले नाही,' असा आरोप रामनाथ चव्हाण यांनी "समकालीन मराठी साहित्य-नव्या वाटा' या विषयावरील परिसंवादात केला. "या वर्गाच्या लेखनात दलित, भटके-विमुक्त यांचे प्रतिबिंब कधीच उमटले नाही,' असे त्यांनी सांगितले. चर्चासत्रात अपर्णा वेलणकर, उषा तांबे, विलास गीते, प्रमोद मुनघाटे आदी सहभाही झाले.

Hits: 12