८०. नागपूर २००७ अरूण साधू

मराठी माणूस सहिष्णु असल्याने कोणत्याही माणसास मराठी भाषा आली नाही तरी महाराष्ट्रात चालते. मात्र आता अस्तित्वाची लढाई उभी राहिल्याने मराठीबाबतची सहिष्णुता कमी करण्याची गरज व्यक्त करून बदलत्या काळात मराठी सजग कशी करता येईल या संदर्भात सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन अरुण साधु यांनी केले. भाषेबाबत मी संकुचित नाही. मराठीची अस्मिता इतर भाषांशी तुलना करता पोकळ वाटते. पुणे- मुंबई येथील मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. मराठी धड नाही. इंग्रजी येत नाही अशी पिढी निर्माण होत आहे याकडे लक्ष वेधून मराठी मातृभाषा असेल त्या राज्यात पहिलीपासून इंग्रजी शिक्षण कितपत योग्य आहे ? असा प्रश्न त्यानी उपस्थित केला. बदलत्या काळानुसार नव्याने परिभाषा निर्माण करावी लागते. भाषा स्थितीशील राहिली तर ती मृत होते हे संस्कृत, ग्रीक भाषेवरून लक्षात घेतले पाहिजे.

Hits: 17