७९. सोलापूर २००६ मारुती चितमपल्ली

आपल्या प्राचीन साहित्यात सृष्टीतील पंचमहाभूतांना आपण दैवते मानली आहेत. त्यापैकी चारही महाभूतांना मानवाने दूषित केले आह्वे. परंतु पाचवे महाभूत जे तेज, ते मात्र सुदैवाने यातून सुटले आहे. सूर्य व त्याच्या प्रकाशाला अद्यापपर्यंत दूषित करण्याच्या प्रयत्नाला मानवाला यश आले नाही. या सर्व निसर्गाचा मानव हा एक अंश आहे. परंतु तो. आपल्या बुद्धिसामर्थ्याने या निसर्गाचा उत्तरोत्तर नाश करत असून, स्वत;च्या पायावर कुठराघात करीत आहे आणि आपल्या विनाशाला कारणीभूत होत आहे.

Hits: 17