७४. इंदूर २००१ डॉ. विजया राजाध्यक्ष

आपल्या घरात उत्कृष्ट मराठी ग्रंथांचा खजिना असावा, घरात वडिलधार्‍या मंडळींनी मुलांशी मराठीत बोलावं. काही शब्द मुद्दाम जाणीवपूर्वक आपल्या संभाषणात आणावेत. चांगल्या कथा, कविता त्यांना वाचून दाखवाव्यात. यामुळे भाषेचे सौंदर्य, लय यांचा मुलांवर संस्कार होतो. इंग्रजीला कमी लेखून मराठीचं वर्चस्व वाढणार नाही. मराठी शिकणार्‍यांची संख्या वाढणे आवश्यक अहे. आजचे विद्यार्थीच उद्याचे वाचक होतात. वाचक निर्माण होण्यासाठी विद्यार्थी घडवणे महत्वाचे आहे. तात्विक चिकित्सा करणारी पुस्तके ही आजची गरज. म्हणून शासकीय पाठबळ असणार्‍या संस्थांनी लेखक व वाचक यांची जडणघडण करणारी पुस्तके काढावीत.

Hits: 11