६४. रत्नागिरी १९९१ - मधु मंगेश कर्णिक

जे माणसांना जोडते ते प्रेम. साहित्य म्हणजे प्रेम. साहित्याचे कार्य माणसांना जोडणे हे होय. त्यांच्यातील माणूसकीचा ओघ आटणार नाही हे पाहणे हे होय. आजूबाजूची सृष्टी, माणसे प्रेमभावनेने न्याहाळून त्याच भावनेने त्यांच्याबद्दलचे लिखाण साहित्यात यावे. साहित्य हे जसे सर्वांसाठी असावे तसेच प्रेमही सर्वांसाठी असावे. आजच्या बदलत्या समाजाला साहित्यापासून काय हवे याचे भान लेखकाने ठेवले पाहिजे. साहित्य म्हणजे केवळ लेखनक्रीडा नव्हे.

Hits: 19