५९. नांदेड १९८५ शंकर पाटील

ज्ञानाची गंगा खेड्यापर्यंत जावी, ग्रामीण भागातही साहित्याची आवड निर्माण व्हावी, तिथल्या सुप्त कलागुणांनाही वाव मिळावा, ग्रामीण विभागातून पुढं येणार्&zwj;या नवोदित लेखकांना पोषक वातावरण लाभावं, त्यांच्या विचारांना चालना मिळावी यासाठी &lsquo;गाव तिथं ग्रंथालय&rsquo; ही योजना आखली जाऊन ती अमलांत आणावी. <br /> आजच्या नियतकालिकांच्या जगातला सगळा व्यापारी झगमगाट बघितला, उत्तान शृंगारावर आणि पांचट, पसरट, ढोबळ विनोदांवर बेतलेले लेखन पाहिलं म्हणजे वाटतं नव्या लेखनप्रयोगाला इथं कोण जवळ करणार ? समजा कोणी जवळ केलंच तर त्याकडं कोणाचं लक्ष जाणार ? खपाऊ मालाच्या ढिगात त्याला कोणाची दाद मिळणार ? अशा या जगात उमेदीचा नवा, प्रयोगशील लेखक आपलं &lsquo;स्वत्व&rsquo; कसं आणि किती काळ टिकविणार ? कदाचित कालाच्या ओघात आपलं &lsquo;स्वत्व&rsquo; सोडून त्या बाजारात तोही मिसळून जाईल, ही शक्यताच अधिक दिसते. यावर उपाय म्हणून एखादा कायम स्वरुपाचा आर्थिक निधी आपण उभारू शकतो. <br /> एकजिनसी समाजाचं स्वप्न साकार करायचं असेल तर मातृभाषेच्या एकाच माध्यमातून  एकाच प्रकारचं शिक्षण सर्वांना उपलब्ध होणं अगत्याचं आहे. सर्व विषयांत, सर्व स्तरावर मराठी माध्यमातून शिक्षण देणारं व संशोधन करणारं एक स्वतंत्र मराठी विद्यापीठ स्थापन झालं पाहिजे.

Hits: 8