५३. १९७९ चंद्रपूर - प्रा. वा. कृ. चोरघडे

सुखदु:खादि भावनांनी साहित्य इतके समृद्ध असावे की वाचकाच्या हृदयाला भिडणारे असावे. तीच खरी वाचकाकडून साहित्यिकाला मिळालेली पावती होय. महाराष्ट्रात तरी मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असावे. सतत कर्मरत असणार्‍या लोकांनी मनाला आनंद मिळावा, विरंगुळा वाटावा म्हणून उत्स्फूर्त ओठातून काढलेला शब्द म्हणजे वाणी-विलास! अशी लोकसाहित्याची व्याख्या केली जाते. भारतीय अस्मितेच्या आधारावरच भारतीय सहित्याचा व मराठी अस्मितेच्या आधारावरच मराठी साहित्याचा विकास व्हायला हवा. साहित्याला धर्म असू शकतो, जात असू शकत नाही. मराठी भाषेचे शुद्ध शिक्षण घ्यायचे असेल तर शिक्षणात संस्कृत व संगीत यांचा अंतर्भाव होणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी व जीवनाच्या सकसतेसाठी शिक्षण स्वस्त व्हायला नको. विद्या कष्टसाध्य असावी.

Hits: 10