४८. १९६९ वर्धा - पु. शि. रेगे

श्री. पुरुषोत्तम शिवराम रेगे यांना असे वाटते की, साहित्यकाराला किंवा कलाकाराला मनाच्या मुक्तपणाची किंवा सर्वस्पर्शी स्वभावाची आवश्यकता असते. प्रत्यक्ष अनुभवापेक्षा अनुभव घेण्याची प्रक्रिया किंवा पद्धती ही साहित्यकाराच्या बाबतीत महत्वाची असते. साहित्य हे जर जीवनातून अलग झाले तर त्याचा आशय अतिवास्तव, अतिरंजित बनतो. साहित्य ही जड किंवा चैतन्यहीन वस्तू नाही. केवळ आविष्कारपद्धती लोकविलक्षण म्हणून ते साहित्य नवीन ठरत नाही. कोणतेही साहित्य जर जीवनाच्या मूळ प्रेरणेपर्यंत जाऊन भिडत नसेल तर असा साहित्यप्रवास व्यर्थच होय.

Hits: 8