४५. १९६४ मडगाव- कवि कुसुमाग्रज

श्री विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज - कुसुमाग्रजांच्या मते सारस्वतांचा मेळावा जमतो ते महाराष्ट्राचे साहित्यविषयक मनोगत व्यक्त करण्यासाठी. राज्यव्यवहारात मराठीचा वापर सर्वत्र व्हावा. लेखक व वाचक यांच्यात एक प्रकारचा संवाद चालत असतो. साहित्याचे साहित्यत्व सिद्ध होते ते अनुभव व आविर्भाव या दोन तत्त्वांमुळे. अविर्भावाने साहित्याचे रूप ठरते तर अनुभवाने त्याचा आशय. या दोहोंच्या संयोगाने साहित्याचा पोत ठरतो. तरी त्यातील धागेपणाचे स्थान अनुभवाचेच असते. म्हणून अनुभवाला अनन्यसाधारण महत्व आहे. अनुभवशीलतेवरच साहित्याचे कमीअधिक मोल ठरते. परंतु अनुभव घेण्याची शक्तीच जर बोथट, संकुचित असेल तर ते साहित्य उथळ, दिखाऊ व क्षणिक काळ टिकणारे ठरते..

Hits: 8