४२. १९६० ठाणे- रा. श्री. जोग

श्री. रा. श्री. जोग यांच्या मते ललितवाङ्मयाचा एक मार्ग हा असत्य-ललित किंवा सत्य-अललित अशा दोन प्रकारची टोके गाठणारा नसावा तर ललितवाङ्मयाने सत्य-ललित हा मध्यम मार्ग निवडावा. कलानिर्मिती होताना कलावंतावर कोणतेही दडपण नसावे, किंवा पैशाच्या लोभाने त्याने ती निर्मिती करू नये. स्वत:च्या आनंदासाठी मनमोकळेपणाने केलेली निर्मिती अधिक सकस असेल. आपल्याला दिसलेले सौंदर्य रसिकांपर्यंत सहजपणे पोहोचविण्याचे काम त्याने करावे. म्हणजेच कलाकृतीत दुर्बोधता नसावी. आपल्याला भावलेला अर्थ वाचकांना, रसिकांना सहज ग्रहण करता यावा यासाठी त्याने प्रयत्न करावा. सुगमता हा सौंदर्याचा एक धर्म असून सौंदर्यप्रकटन हा ललितवाङ्मयाचा मूळ हेतू आहे.

Hits: 7