४१. १९५९ मिरज - श्री. के. क्षीरसागर

मराठीतील सौंदर्यवादाचे प्रणेते असणार्‍या श्री. के. क्षीरसागर यांनी नववाङ्मयातील अनौचित्याची, विफलतेची, मूर्तिभंजकतेची, अश्रद्धेची परखड चिकित्सा केली आहे. प्रांतिक भाषांना राष्ट्रभाषेसारखा किंवा इंग्रजीसारखा दर्जा लाभावा असे प्रामणिक त्यांचे मत. अर्वाचीन युगात साहित्य ही समाजमनावर हुकमत गाजविण्याची सर्वात मोठी शक्ती. नव्या पिढीत कामपूजक, हताश वैतागी वाङ्मयाचे चित्र दिसू लागले आहे. ते कमी करण्यासाठी साहित्यिकांनी सशक्त साहित्य निर्माण करावे व नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याचे काम अशा प्रकारच्या साहित्याने होऊ शकते.

Hits: 8