३९. १९५७ औरंगाबाद - अनंत काणेकर

भाषिक राज्यहिताची मागणी देशहितास मुळीच विघातक नाही. भाषा ही मानवी जीवनाचा जिवंत आविष्कार आहे. भाषेचा वृक्ष जनतेच्या जीवनातून उगवतो आणि जनताजीवनच्या विकासाबरोबर विकसित होत असतो. लोकभाषेतच जीवनाचे जास्तीत जास्त व्यवहार चालले पाहिजेत. एकभाषिक मराठी राज्याच्या अत्युच्च न्यायालयाची भाषा मराठी तसेच विद्यापीठाची, विधानसभेची, सरकारी कारभाराची, मंत्र्यांची, मोलकर्‍यांची अशा सर्वांची भाषा मराठी असे झाले की मराठी जनतेचे जीवन एक्जीव, एकजिनसी होऊन अधिकाधिक समृद्ध होईल. जीवन समृद्ध म्हणून भाषा समृद्ध आणि भाषा समृद्ध म्हणून जीवन समृद्ध होईल अशी ही समृद्धीची साखळी असते.

Hits: 10