२९. १९४४ धुळे - मामा वरेरकर

 

आजच्या राष्ट्रीय जीववनासाठी सर्वसामान्य जनसमाजाला मार्गदर्शन करू शकेल अशा वाङ्मयाची सध्या गरज आहे. साहित्याने आता लोकाभिमुख होणे आवश्यक आहे. लिहिले जाते ते साहित्य आणि बोलले जाते ते वाङ्मय. न लिहिता बोलले जाणारे जे वाङ्मय आहे तेच बहुजनांचे वाङ्मय आहे. त्याच वाङ्मयाच्या द्वारे नवे विचार, नव्या आकांक्षा जनतेसमोर रुजू करण्याचा प्रयत्न संघटित स्वरूपात झाला पहिजे. तमाशाची हेटाळणी करून चालणार नाही. पोवडे, लावण्या या साधनांचा उपयोग क्रांती घडवून आणण्यासाठी झाला पाहिजे. लिहिलेले आणि न लिहिलेले प्रत्येक साहित्य आणि प्रत्येक वाङ्मय लोकाभिमुख करण्याचे पद्धतशीर प्रयत्न आज सुरू झाले पाहिजेत.

Hits: 8