२४. अहमदनगर १९३९ - द. वा. पोतदार

 

मराठीचा स्वतंत्र प्रांत हवा, मराठीच्या अभ्युदयासाठी विद्यापीठ हवे. मराठीचे सामर्थ्य वाढले पाहिजे. आपल्या सर्व संस्थांचे व्यवहार मराठीत चालले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तिपर्यंत मराठीच्या अभिमानाचे हे लोण पोहोचविले पाहिजे. मराठीविषयी सर्वांची अंत:करणे बालपणापासून नितांत प्रेमवृत्तीने भरून ओसंडून गेली पाहिजेत असे केले पाहिजे. तरच मराठीचे दुर्दिन संपतील. ती आपल्याला हसवील, रिझवील, नाचवील आणि मराठीचा झेंडा सर्वत्र मिरवेल.

Hits: 8