२१. इंदूर १९३५ - भ. बा. पंतप्रतिनिधी

 

नव्या तरूण पिढीवर आमचा फार विश्वास आहे. राष्ट्राच्या खर्‍या उद्धाराचे ते खरे स्तंभ आहेत असे आमचे प्रांजल मत आहे. मात्र जुन्यांच्या लिहिण्याबोलण्यामध्येही हल्लीच्या काळाला लागेल असे काय आहे याचा त्यांनी विचार करावा आणि आपले सर्व सामर्थ्य केवळ सनातन्यांशी भांडण्यात खर्च न करता, आपल्या समाजात उत्क्रांतीच्या मार्गाचे अवलंबन करता येईल असे काही भरीव कार्य करावे अशी त्यांस प्रार्थना आहे.

Hits: 11