Designed & developed byDnyandeep Infotech

दुर्गा भागवत

Parent Category: व्यक्तिपरिचय

दुर्गा भागवत या लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य यांच्या संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. बौध्द धर्माच्या अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ व मानववंशास्त्रज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती आहे. दुर्गा भागवत यांचा जन्म इ.स. १९१० मध्ये इंदूर येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई, अहमदनगर, नासिक, धारवाड, पुणे अशा निरनिराळ्या ठिकाणी झाले. शिक्षण घेत असतानाच्या काळात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातही भाग घेतला होता थोडे दिवस ‘साहित्य सहकार’या मासिकाचे संपादनही त्यानी केले होते.

दुर्गा भागवत लेखनस्वातंत्र्याच्या कट्टर पुरसकर्त्या आहेत. त्यासाठी त्यांनी आणीबाणीच्या काळात कारावास भोगला होता. अनेक सामाजिक चळवळीतही त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या ‘पैसे ’ या ग्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला होता. इ.स.१९७५ मध्ये कराड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

ग्रंथसंपदा : अ‍ॅन आउटलाइन ऑफ़ इंडियन फ़ोकलोअर; रिडल इन इंडियन लाईफ़; लोअर अ‍ॅड लिटरेचर; ए डायजेस्ट ऑफ़ कंपॅरिटिव्ह फ़िलॉलॉजी; रोमान्स इन सॅक्रिड लोअर; ए प्रायमर ऑफ़ अ‍ॅथ्रोपॉलॉजी इत्यादी इंग्रजी ग्रंथ. पैसे, व्यासपर्व, डूब, ऋतुचक्र, महानदीच्या तीरावर, पूर्वा, रूपरंग, लोकसाहित्याची रुपरेखा, धर्म व लोकसाहित्य, भावमुद्रा, केतकरी कांदबरी, प्रासंगिका, जनतेचा सवाल इत्यादी मराठी ग्रंथ.

X

Right Click

No right click