रवींद्र मेस्त्री

Written by Suresh Ranade

रवींद्र मेस्त्री यांचे चित्र म्हणचे कोल्हापूरकर रसिकांना एक वेगळा अनुभव आहे. कोल्हापुरात वेगवेगळया चित्रकारांनी व्यक्तिचित्रे रंगविली. बहुतेक चित्रकरांनी केलेल्या व्यक्तिचित्रात रंगलेपनपध्दती, मांडणी, छायाप्रकाश, क्षेत्रांची विभागणी इत्यादी गोष्टीत एक प्रकारचा संलग्नपणा आढळतो. एक विशिष्ट तऱ्हेची परंपरा मागे असल्यासारखी वाटते व तिचा उगम इंग्रजी चित्रपध्दतीत झाल्याची खात्री पटते. पण रवींद्र मेस्त्री यांचे चित्र पाहताच वस्तूंच्या मांडणीबद्दल, रंगलेपनाबद्दल व प्रकाशयोजनेबद्दलही एक वेगळा अनुभव येऊ लागतो. याचे मुख्य कारण असे की, त्यांच्या या चित्रपध्दतीचा उगम फ्रेंच दृक् प्रत्ययवादी चित्रपध्दतीशी अधिक जुळता आहे.

Hits: 40