Designed & developed byDnyandeep Infotech

शेगाव

Parent Category: महाराष्ट्र दर्शन
      

शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा व अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे संत महाराष्ट्राच्या घराघरातून पूजिले जातात. अक्कलकोट स्वामींप्रमाणेच श्री गजानन महाराजांचा पूर्वेतिहास अजून पूर्णतया ज्ञात नाही. १८७८ च्या सुमारास ते वऱ्हाडातील शेगाव नावाच्या एका लहानशा गावात प्रगटले व इ.स. १९१० ला त्यांनी शेगाव येथेच समाधी घेतली.

श्री गजानन महाराज हे विदेही, दिगंबर वृत्तीचे आणि सिद्धकोटीला पोहचलेले संत होते. त्यांच्या वास्तव्याने व चमत्कारांमुळे शेगाव व त्या भोवतालच्या परिसरातसर्वसामान्य भक्तजनांचे कल्याण झाले. श्री गजानन महाराजांनी ज्या ठिकाणी देह ठेवला तेथेच त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले असून या ठिकाणी भक्तांची सदैव ओघ वाहतो.

जवळपास ३२ वर्षे श्री गजानन महाराजांचे वास्तव्य शेगाव येथे होते. येथील समाधीस्थानाची सर्व व्यवस्था ट्र्स्टतर्फे पाहिली जाते. या ट्न्स्टतर्फेच येथे अनेक लोकोपयोगी व शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातात. भक्तांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही केली जाते.

समाधी मंदिराशिवाय श्री गजानन महाराजांच्या जिवितकार्याशी निगडित अनेक दर्शनीय स्थाने शेगावच्या परिसरात आहेत.

X

Right Click

No right click