मनाचे श्लोक १२१-१३०

Written by Suresh Ranade

महा भक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।
म्हणोनी तयाकारणे सिंह जाला ॥

न ये जाळ वीषाळ संन्नीध कोणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२१॥

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।
तयाकारणे वामनु चक्रपाणी ॥

द्विजाकारणे भार्गवू चापपाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२२॥

अहिल्ये सतीलागि आरण्यपंथे ।
कुढावा पुढे देव बंदी तयाते ॥

बळे सोडिता घाव घाली निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥१२३॥

तये द्रोपदीकारणे लागवेगे ।
त्वरे धांवतो सर्व सांडूनि मागे ॥

कळीलागि जाला असे बौध्द मौनी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२४॥

अनाथा दिनाकारणे जन्मताहे ।
कलंकी पुढे देव होणार आहे ॥

जया वर्णिता शीणली वेदवाणी ।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२५॥

जनाकारणें देव लीलावतारी ।
बहूतांपरी आदरे वेषधारी ॥

तया नेणती ते जन पापरूपी ।
दुरात्मा महानष्ट चांडाळ पापी ॥१२६॥

जगी धन्य जो रामसूखे निवाला ।
कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला ॥

देहेभावना रामबोधे उडाली ।
मनोवासना रामरूपी बुडाली ॥१२७॥

मना वासना वासुदेवी वसो दे ।
मना कामना कामसंगी नसो दे ॥

मना कल्पना वाउगी ते न कीजे ।
मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे ॥१२८॥

गती कारणे संगती सज्जनाची ।
मती पालटे सूमती दुर्जनाची ॥

रतीनायिकेचा पती नष्ट आहे ।
म्हणोनी मनातीत हो्ऊनि राहे ॥१२९॥

मना अल्प संकल्प तोही नसावा ।
सदा सत्य संकल्प चिती वसावा ॥

जनी जल्प विकल्प तोही त्यजावा ।
रमाकांत एकांतकाळी भजाव

Hits: 19