लोण्याची बिस्किटे

Written by Suresh Ranade
 
लोण्याची बिस्किटे
 
साहित्य :-
अर्धा किलो मैदा, एक वाटी दही, पाव किलो साखर, पाच ग्रॅम अमोनिया, एक चमचा सोडा, पाव किलो लोणी
कृती :

लोणी, साखर, दही, अमोनिया व सोडा ही सर्व एका थाळीत अगर परातीत एकत्र करून चांगले फेसावे. नंतर त्यात मैदा घालून, एकत्र मिसळून मळावे. पीठ घट्ट वाटल्यास आणखी थोडे दही घालावे. एक तासभर हे पीठ ठेवून द्यावे. नंतर पोळया लाटून बिस्किटे कापून घेऊन खालीवर निखारे ठेवून अगर ओव्हनमध्ये भाजावीत.

 

Hits: 35