नाशिक चिवडा

Written by Suresh Ranade

 

 
नाशिक चिवडा
 
साहित्य :-
मापी सहा शेर भाजके पोहे, पाऊण किलो तेल, साखर, सुके खोबरे एक वाटी, तीन वाट्या शेंगदाणे, दीड वाटी डाळे, अर्धा किलो कांदे, तिखट, मीठ, तीन-चार अमसुले, मसाल्याचे साहित्य (लवंग, दलाचिनी, जिरे, शहाजिरे, धने, तमालपत्र, दगडफूल, मिरे, बडीशेप, तीळ हिंग हे सर्व जिन्नस प्रत्येकी १० ग्रॅम)
कृती :
   प्रथम कांदा उभा चिरून, उन्हात वाळवून घ्यावा. वर लिहिलेले मसाल्याचे साहित्य प्रत्येकी समप्रमाण घेऊन, ते सर्व जिन्नस तेलावर भाजून कुटावेत व चिवड्याचा मसाला तयार करावा. खोबऱ्याचे लांब लांब काप तयार करावेत. पोहे निवडून घ्यावेत. तेल घेऊन, ते तापत वाळलेले कांद्याचे काप, नंतर खोबऱ्याचे काप, नंतर अमसुले व नंतर शेंगदाणे या क्रमाने तळून घ्यावेत. नंतर तेल खाली उतरवून, त्या तेलात चवीप्रमाणे मीठ व तिखट, हळद, तळलेली अमसुले कुटून व तयार केलेल्या मसाल्यापैकी पुरेसा मसाला, दाणे, खोबऱ्याचे काप, कांद्याचे काप व डाळे हे सर्व घालून व पोहे घालून चांगले एकत्र कालवावे व चिवडा सारखा करावा. हा चिवडा जरा गोडसर असतो, म्हणून त्या मानाने साखर घालावी.
Hits: 26