Designed & developed byDnyandeep Infotech

साबुदाण्याच्या चकल्या

Parent Category: मराठी संस्कृती
साहित्य :-
साबूदाणा एक वाटी, वाटलेल्या बटाट्याचा गोळा एक वाटी, सात-आठ ओल्या मिरच्या, मीठ, दोन चमचे जिरे, अगदी बारीक केलेले कच्च्या शेंगदाण्याचे कूट अर्धी वाटी, तूप.

कृती :
बटाटे उकडून पुरण वाटावयाच्या यंत्रातून वाटून घ्यावेत. साबूदाणा भिजवून मोकळा करून घ्यावा. साबूदाणा, बटाट्याचा वाटलेला गोळा व दाण्याचे कूट एकत्र करावे आणि त्यात मीठ, मिरच्या व जिरे एकत्र वाटून घालावे. नंतर सर्व चांगले मळून त्याच्या प्लॅस्टिकच्या कागदावर चकलीपात्रातून चकल्या कराव्यात व तुपात तळून काढाव्यात. गरम असतानाच चकल्या खावयास घ्यावेत. गार झाल्यावर मऊ पडतात.
(टीप- वरील चकल्यांत दाण्याच्या कुटाऐवजी पाव वाटी वऱ्याचे तांदूळ शिजवून घेऊन घालावेत व चकल्या करून उन्हात वाळवून भरून ठेवाव्यात. वर्षभर टिकतात. पाहिजे त्या वेळी तुपात तळून खावयास द्याव्यात.)
X

Right Click

No right click