गव्हाची खीर

Written by Suresh Ranade

 

 
गव्हाची खीर
 
साहित्य :-
अर्धा किलो खपली गहू (शक्यतो खपली गहू घ्यावे, कारण इतर गहू चांगले मऊ शिजत नाहीत), पाऊण किलो चांगला गूळ, एक मोठा नारळ, अर्धी वाटी खसखस, १०-१२ वेलदोडे, एक वाटी तांदूळ, दूध.
कृती :
 खीर करावयाच्या आदल्या दिवशी गहू पाणी लावून चांगले सडावेत व कोंडा काढून टाकावा. सडून घेतलेला गहू व तांदूळ रात्री वेगवेगळे भिजत टाकावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी पातेल्यास तेलाचा हात लावून गहू शिजत टाकावेत. गहू शिजण्यास बराच वेळ लागतो. गहू अर्धवट शिजून झाल्यावर त्यात भिजत घातलेले तांदूळ घालावेत व आणखी शिजवावे. गहू अगदी मऊ असे शिजल्यावर ते पळीने ठेचावेत. मग त्यात गूळ, नारळाचे खोवून घेतलेले खोबरे, वेलचीची पूड व भाजून घेतलेली व किंचित् कुटलेली खसखस घालावी व थोडा वेळ शिजवून खाली उतरवून ठेवावे. वाढावयाच्या वेळी थोडेसे दूध घालावे व खीर सारखी करून वाढावी.
Hits: 14