मोदक

Written by Suresh Ranade
 
मोदक

साहित्य :-
२ मोठे नारळ, अर्धा किलो तांदळाची पिठी, गूळ पाव किलो, पाव जायफळाचा किस, १ चमचा लोणी, काजू, बेदाणेo
कृती :
    

सारण- नारळ खोवून त्यात चिरलेला गूळ मिसळून ते फ्रायपॅनमध्ये घालून गॅसवर ठेवावे. गूळ पातळ होऊ लागला की सारखे ढवळत राहावे. १५ मिनिटांत सारण तयार होते. मग त्यात जायफळाचा कीस व काजू-बेदाणे घालावेत.

उकड- प्रथम पिठी भांड्यात मोजून घ्यावी व त्यापेक्षा थोडे कमी पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात लोणी व थोडे मीठ टाकावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात पिठी घालावी व झाऱ्याने ढवळावे. एक-दोन वाफा आणाव्यात. गार झाल्यावर तेलपाण्याचा हात घेऊन उकड चांगली मळावी. प्रोसेसर असल्यास त्यावरही चांगली मळली जाते. नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करावेत. त्याची हातावर पुरीसारखी पारी करावी. त्यात वरील सारण घालून कडांवर थोड्या थोड्या अंतरावर चिमटे घेऊन मोदक वळावा. मोदक वळून झाल्यावर मोदकपात्रात अथवा कुकरमध्ये इडलीप्रमाणे उकडून घ्यावेत. वरील सारणाचे १५ ते १६ मोदक होतात. सारणात गुळाऐवजी साखरसुद्धा वापरता येते; परंतु गुळाचे सारण जास्त खमंग लागते.

Hits: 20