वर्‍याच्या तांदळाचे मोदक

Written by Suresh Ranade
 
वऱ्याच्या तांदळाचे मोदक

साहित्य :-
दोन वाट्या वऱ्याच्या तांदळाचे पीठ, एक लहान नारळ, दोन वाट्या गूळ अगर साखर, वेलदोडे, दोन चमचे तूप.
कृती :
  वऱ्याचे तांदूळ स्वच्छ धुऊन बारीक दळून पीठ करावे. नारळ खोवून त्यात गूळ अगर साखर घालून शिजवून सारण तयार करावे. त्यात वेलचीची पूड घालावी. दोन वाट्या पाण्याचे आधण ठेवून त्यात अर्धा चमचा मीठ व दोन चमचे तूप घालावे. उकळी आल्यावर दोन वाट्या वऱ्याचे पीठ घालून व ढवळून दोन वाफा आणाव्यात. उकड कढत असतानाच मळून त्याच्या पापड्या करून व त्यात सारण भरून नेहमीच्या तांदळाच्या मोदकाप्रमाणे मोदक करून उकडावेत.
Hits: 16