आप्पे

Parent Category: मराठी संस्कृती
साहित्य :-
दोन वाट्या चण्याची डाळ, अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी पोहे, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, एक ते दीड वाटी बारीक चिरलेला कांदा, दहा बारा ओल्या मिरच्या, कोथिंबीर, कढीलिंब, मीठ, काजू अगर शेंगदाणे (भाजलेले), एक चमचा आंबट दही, लागेल तसे तेल, थोडा सोडा, थोडी साखर, आले.

कृती :
रात्री डाळ व तांदूळ भिजत घालावेत. निराळया भांडयात पोहे भिजत घालावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी डाळ व तांदूळ जाडसर वाटावेत. वाटलेल्या पिठात मिरच्या (जाडसर वाटून), कोथिंबीर व कढीलिंब (चिरून), खोबऱ्याचा कीस, काजू, भिजत घातलेले पोहे व तसेच चवीस मीठ, एक चमचा आंबट दही, चिमटीभर सोडा व साखर घालून सर्व जिन्नस एकत्र करून कालवावेत. आवडत असल्यास एक मोठा कांदा बारीक चिरून व आले वाटून घालावे. याप्रमाणे पीठ तयार झाल्यावर आप्पेपात्राच्या खोलगट वाटीवजा साच्यात अर्धा साचा भरेल इतके तेल घालावे. मध्यम आकाराच्या लिंबाएवढे पीठ त्यावर घालून मंद विस्तवावर आप्पे करावेत.
X

Right Click

No right click