आलू-टिक्की

Written by Suresh Ranade
 
आलू-टिक्की

साहित्य :-
चार मध्यम बटाटे उकडलेले, चार स्लाईस ब्रेड अगर दोन लहान पाव, एक हिरवी मिरची, अर्धा चमचा जिरं बारीक कुटलेलं, अर्धा टी स्पून अनार दाणे कुटून (किंवा) अर्ध्या लिंबाचा रस अगर पाव चमचा आमचूर, चवीला मीठ व बारीक चिरलेली कोथिंबिर, तळायला तेल.
कृती :
     बटाट्याची सालं काढून बारीक कुस्करून ठेवणे, पाव पाण्यात दीड मिनिटं भिजत घालून लगेच काढून घट्ट पिळून बटाट्यात मिक्स करणे, मिरची कोथिंबिर, जिरे पावडर इत्यादी सर्व पदार्थ मिक्स करून ठेवणे. लिंबाएवढा गोळा घेऊन त्याला दाबून गोल चपटा करावा व भरपूर तेलात तळून काढावा. जरा जाडसर ठेवावा. पॅटीससारूखा पुदिना, चटणी टिक्कीबरोबर द्यावी.
Hits: 14