आंबोळे

Written by Suresh Ranade
 
आंबोळे
 
साहित्य :-
सहा वाट्या तांदूळ, एक वाटी तांदळाच्या कण्या, मीठ, सोडा, तेल, नारळ, गूळ, जायफळ.
कृती :
  तांदूळ, भाजून धुवावेत व सावलीत वाळवावेत. नंतर दळून बारीक पीठ करावे. नंतर तांदळाच्या कण्यांची पेज करून त्यात तांदळाचे दळून घेतलेले पीठ घालावे व साधारण घट्ट कालवावे. त्या पिठात चार चमचे तेल व एक चमचा मीठ घालून व कालवून कल्हइच्या भांड्यात मिश्रण झाकूण ठेवावे. एक दिवस असे ठेवून द्यावे. नंतर ते फसफसून येईल. मग त्यात अर्धा चमचा सोडा घालून ते हाताने ढवळून एकजीव करावे. कढईला तेल लावून ती तापल्यावर त्यात वाटीने पिठाचा जाडसर थर ओतावा. वर ताट झाकावे. विस्तव मंद ठेवावा. थोड्याच वेळात बनपावाप्रमाणे फुगून वर येईल. नंतर परतून गुलाबी रंग आल्यावर काढून घ्यावे. नारळाचे दूध काढून त्यात गूळ व जायफळ उगाळून घालून त्याच्याबरोबर आंबोळे खावयास द्यावे.
Hits: 24