Designed & developed byDnyandeep Infotech

दही-वडे

Parent Category: मराठी संस्कृती
साहित्य :-
दोन वाट्या उडदाची डाळ, सहा वाट्या गोड मलईचे दही, साखर, मीठ, जिरे, हिंग, ओल्या मिरच्या, आले, कढीलिंब, तेल.

कृती :

वडे करण्यापूर्वी सात-आठ तास आधी उडदाची डाळ भिजत घालावी. भिजल्यावर ती चांगली वाटावी. त्यात चवीला मीठ घालावे. नंतर त्या वाटलेल्या डाळीचे वडे तेलात तळावे व पाण्यात टाकावे. दुसरा घाणा तळून होईपर्यंत पहिला घाणा पाण्यात ठेवावा. नंतर वडे दाबून, पाणी काढून टाकावे व वडे थाळीत पसरून ठेवावे. सर्व वडे झाल्यावर तीन वाट्या झाल्यावर दह्याचे ताक घुसळावे. त्या ताकात चवीप्रमाणे मीठ, साखर, आल्या मिरच्या व आले वाटून घालावे व आवडत असल्यास हिंग, जिरे, सुक्या मिरच्या व कढीलिंब घालून फोडणी करून तीही घालावी. नंतर हे तयार केलेले ताक थाळीतील वड्यांवर घालावे. नंतर उरलेले दही थोडेसे घुसळून सारख करावे. त्यात थोडी साखर व मीठ घालावे. नंतर वडे खावयास देतेवेळी वरील ताकातील वडे डिशमध्ये ठेवावेत व त्यावर घुसळलेले दही घालावे. वर अगदी लाल तिखट, जिऱ्याची पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून टाकावी. लाल तिखट वर घातल्यामुळे वडे चांगले व उठून दिसतात. म्हणून तिखट पाहिजे तर घालावे. घातलेच पाहिजे, असे नाही.

X

Right Click

No right click