इडली सँडविच

Written by Suresh Ranade
साहित्य :-
उकडलेल्या इडल्या, एक काकडी, एक टोमॅटो, एक उकडलेला बटाटा, हिरवी चटणी, टोमॅटो केचप, तळायला रिफाइंर्ड तेल, टूथ पिक्स
कृती :

इडलीमध्ये कापून भरपूर तेलात तळून घ्याव्यात. इडलीच्या एका भागावर चटणी लावावी. दुसऱ्या भागावर टोमॅटो क्रॅचअप लावावे. काकडीचं साल काढून पातळ गोल काप करावे. टोमॅटोचे पातळ गोल काप कापावे. बटाट्याचे साल काढून पातळ गोल काप कापावे. सर्व कापांना थोडंसं मीठ व मिरपूड लावून ठेवा. इडलीच्या एका भागवर एक काकडीचा तुकडा, एक टोमॅटोचा तुकडा, एक बटाट्याचा तुकडा ठेवून वरती इडलीचा दुसरा भाग ठेवून जरासा दाब देऊन वरतून टूथ पीक आरपार टोचावी. इडली जराश्या तुपात तव्यावर थोडा वेळ परतली तर तीपण इडली चटणीबरोबर चांगली लागते.

 

Hits: 17