बटाटा कचोरी

Written by Suresh Ranade
साहित्य :-
सहा मोठे बटाटे उकडलेले, एक वाटी ओलं खोबरं खवलेले, एक हिरवी मिरची बारीक चिरलेली, अर्ध्या लिंबाचा रस, चवीला साखर, मीठ, थोडेसे काजू तुकडा व खिसमिस, अर्धा चमचा भाजलेले तीळ, बारीक चिरलेली कोथिंबिर, आरासर अगर कॉर्नफ्लॉवर तेल.
कृती :

बटाट्याची साल काढून बारीक कुसकरून ठेवावेत. चवीला मीठ घालावे. बटाटे चिकट असतील तर त्यात अर्धा चमचा आरासर अगर कॉर्नफ्लॉवर मिक्स करून मळावे. खोबऱ्यात मिरची, कोथिंबिर, काजू, खिसमिस, तीळ, साखर, मीठ घालून लिंबाचा रस घालून मिक्स करून ठेवणे. बटाट्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्याची खोलगट वाटी करावी व त्यात खोबऱ्याचे सारण घालून बंद करून गोल गोळा करावा. सर्व कचोऱ्या वळून झाल्यावर त्यावर थोडा आरासर अगर कॉर्नफ्लॉवर घालून कचोरीला लावून ठेवणे म्हणजे कचोरी एकमेकांना चिकटणार नाहीत व तळताना फुटणार नाहीत. मोठ्या गॅसवर तळावे. तेल गरम हवे. कचोरी गुलाबी रंगांवर तळाव्यात व टोमॅटो केचप अगर चटणी बरोबर द्यावी.

 

Hits: 13