कोळाचे पोहे

Written by Suresh Ranade

 

साहित्य :-
अर्धा किलो जाड पोहे, एक मोठा नारळ, मीठ, एक-दोन हिरव्या मिरच्या, दोन-तीन सुक्या मिरच्या, अर्धी वाटी चिंचेचा कोळ, अर्धी ते पाऊण वाटी गूळ, कोथिंबीर, तूप, जिरे, हिंग.
कृती :
 नारळ खोवून, त्यात पाणी घालून वाटावे व खोबऱ्याचे दूध काढून घ्यावे. हे दूध सहा ते सात वाट्या होईल इतके करावे. (त्याकरिता पाणी घालून परत परत वाटावे) चिंच भिजत घालून चिंचेचा अर्धी वाटी दाट कोळ या दुधात घालावा. तसेच या दुधात अर्धी वाटी ते पाऊण वाटी गूळ घालावा. मीठ व हिरव्या मिरच्या वाटून लावाव्या व कोथिंबीर बारीक चिरून घालावी. हिंग, जिरे घालून तुपाची फोडणी करावी. फोडणीत सुक्या मिरच्यांचे तुकडे व कढीलिंब घालावा व वरील दुधास ती फोडणी वरून द्यावी. खावयास घेण्यापूर्वी पोहे पंधरा मिनिटे धुऊन ठेवावेत व खावयास देताना ते एका खोलगट डिशमध्ये घालून त्यावर वरील तयार केलेले दूध घालावे. हे पोहे फार रूचकर लागतात. ह्या पोह्यास दुधाकरिता जितके जास्त खोबरे घ्यावे, तितके चांगले. नारळाचे दूध जास्त घातल्यास पोहे जास्त चांगले लागतात.

 

Hits: 19