पाव-भाजी

Written by Suresh Ranade

 

 

साहित्य :-
१ वाटी फ्लॉवरची फुलं, अर्धी वाटी सोललेले हिरवे वाटाणे, र्अूी वाटी बारीक चिरलेली सिमला मिरची, चार मोठे बटाटे, तीन मध्यम कांदे, चार मध्यम टोमॅटो, मोठा तुकडा आलं, साधारणत: दोन इंच, १०० ग्रॅम अमूल बटर बाकीट, अर्धा चमचा तिखट, चवीला मीठ, अर्धे लिंबू. कोंथिंबीर बारीक चिरलेली, एक कांदा बारीक चिरून, सहा लहान पाव.
कृती :
 बटाटे, वाटाणे, फ्लॉवर उकडून ठेवावेत. कांदे बारीक चिरून ठेवावेत. कांदे बारीक चिरून ठेवावेत. टोमॅटो बारीक चिरणे. बटाट्याची साल काढून एकदम बारीक कुसकरून ठेवावा. वाटाणा, फ्लॉवर पण बारीक करून बटाट्यात मिक्स करणे. मोठ्या तव्यावर अगर अरूंद पसरट कढईत एक टेबलस्पून बटर घालावे व अर्धा डाव रिफाइंर्ड तेल घालावे. (कारण सर्वच बटर घालणे शक्य नसेल तर तेलाचा वापर करावा.) बटर पातळ झाले की बारीक चिरलेला कांदा नरम होईपर्यंत परतत राहावा. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो झालून परतावे. आलं धुऊन सालं काढावीत. लसून सालासकटच घ्यावा व दोन्ही एकत्र चांगलं ठेचून एका भांड्यात घालून त्यात एक वाटी पाणी घालून ठेवणे. टोमॅटो जरा नरम झाला की सिमला मिरचीचे तुकडे घालून नरम होऊ द्यावे. नंतर बटाटा, फ्लॉवर, वाटाणा मिक्सरमध्ये घालून सर्व एकत्र मिक्स करावे. त्यात हळद, तिखट, मीठ, पाव-भाजी मसाला घालून आलं-लसणीचे अर्ध पाणी घालून चांगले ढवळावे. भाजी चांगली एकजिव झाली पाहिजे. त्याच्यासाठी वरवंट्याचा उपयोग चांगला होतो. वरवंट्यानी भाजी ठेचावी म्हणजे एकजीव पटकन होते. मीठ घालावे. मधूनमधून थोडं थोडं बटर व आलं, लसून पाणी घालत राहावं. (आलं-लसूण घालू नये. वाटल्यास आलं-लसूण घालू नये. वाटल्यास आलं-लसूनमध्ये आणखीन पाणी घालून ठेवावे.) भाजी घट्ट नको. पावाबरोबर खाण्यासाठी हवी. लहान पावामध्ये चिरून त्याला आतून-बाहेरून लोण्याचा हात लावून पाव तव्यावर जरा भाजावा. गरम भाजीवर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर व थोडं लिंबू पिळून गरम पाव द्यावेत. तिखट-मिठाचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे ठेवावे.
Hits: 15