Designed & developed byDnyandeep Infotech

स्प्रिंग डोसा

Parent Category: मराठी संस्कृती
साहित्य :-
डोश्यासाठी - तीन वाट्या तांदूळ, एक वाटी उडीद डाळ, अर्धी टी स्पून मेथी दाणे.
भाजीसाठी - एक वाटी उभा चिरलेला पातळ कोबी, एक वाटी पातीचा कांदा चिरलेला पातीसकट, अर्धी वाटी सिमला मिरची उभी चिरलेली, एक चिमूट ओवा, अर्धा चमचा सोया सॉस, अर्धा चमचा व्हीनीगर, चवीला मीठ, एक चिमूट मिरपूड, १ चिमूट अजिनोमोटा (किंवा) दोन वाटी रिफाइंर्ड तेल.

कृती :

डोश्यांसाठी - तांदूळ, डाळ, वेगवेगळे ४ ते ५ तांस भरपूर पाण्यात भिजत ठेवावे. मेथी तांदळात घालावी. नंतर तांदळातले पाणी काढून मिक्सरमध्ये तांदूळ थोडेथोडे पाणी घालून बारीक वाटावेत. नंतर डाळ वाटावी. पाणी काढून बारीक वाटणे. नंतर डाळ-तांदूळ वाटण एकत्र करून ठेवावे. डोसे लगेच पण काढता येतात. अगर रात्रभर भिजून सकाळी काढावेत. पीठ मात्र जास्त पातळ करू नये. घट्टच असावे. म्हणजे पीठ तव्यावर पसरवायला व पातळ डोसा काढण्यास बरे पडते. नॉन स्टिक तव्यावर तवा तापल्यावर प्रथम अर्धा चिरलेला कांदा चोळावा. नंतर एक चमचा तेल तव्यावर लावावे व पाण्याचा हपका मारावा. मग एक डाव पीठ तव्याच्यामध्ये घालून झटकन डावाने गोल गोल पसरवत जावे. पातळ पसरावे. कालच्या पाण्यात बुडवून त्याने डोसा दाबून दाबून सारखा करावा. मग चमचाभर तेल डोश्याच्या कडेकडेने सोडावे. कालथ्याने डोसा सोडवून त्याचा रोल बनवावा. चटणी अगर भाजी बरोबर अगर डोसा तव्यावर असतानाच मध्ये भाजी घालून रोल करून काढून घ्यावा.

भाजी - एक चमचा तेल गरम करून त्यात ओवा फोडणीस घालून प्रथम कांदा, मग सिमला मिरची तुकडे घालून जरा नरम करावी. नंतर कोबी, कांद्याच्या पातीचे तुकडे, मीठ घालून भाजी परतावी. भाजी नरम झाली की त्यावर एक चमचा सोयासॉस, अर्धा चमचा व्हीनिगर घालून ढवळून लगेच उतरावी. आवडत असल्यास चिमूट अजिनामोटो घालावे. ही भाजी डोश्यात भरावी. नेहमीच्या डोश्याच्या भाजीपेक्षा जरा ही वेगळा चायनीज पद्धतीची स्प्रिंग रोलची भाजी डोश्यासाठी.

X

Right Click

No right click