Designed & developed byDnyandeep Infotech

टोमॅटो आम्लेट

Parent Category: मराठी संस्कृती
साहित्य :-
चण्याचे पीठ दोन वाट्या, एक मोठा टोमॅटो, तीन-चार हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, लसणीच्या पाच-सहा पाकळया, जिरे, मीठ, कोथिंबीर, तेल.

कृती :
मिरच्या, आले व लसूण वाटून घ्यावी. टोमॅटो बारीक चिरून व रवीने अगर मिक्सरमध्ये घुसळून घेऊन तो वरील वाटलेल्या गोळयात घालावा. आणि हे मिश्रण चण्याच्या पिठात घालावे. नंतर पिठात मीठ, जिरे, चिरलेली कोथिंबीर आणि दोन चमचे तापलेले तेल घालून व जरूर तेवढे पाणी घालून पातळसर पीठ भिजवावे व जाड तव्यावर तेल टाकून हे पीठ घालावे. हे पीठ जरा जाडच घालावे. वर झाकण ठेवावे. आम्लेट खावयास देताना बरोबर लोणी द्यावे.
X

Right Click

No right click