Designed & developed byDnyandeep Infotech

शेवयांची खीर

Parent Category: मराठी संस्कृती
साहित्य :-
२ वाट्या तांदळाची पिठी, ३ वाट्या पाणी, २ चमचे तूप, २ वाट्या ओल्या नारळाचा कीस, १ वाटी गूळ, वेलदोड्याची पूड चवीपुरते मीठ

कृती :
तांदळाची पिठी घेऊन पाणी, चवीपुरते मीठ व २ चमचे तूप घालून उकड करून घ्यावी. उकड गरम असतानाच मळून त्याचे मुटके करून चाळणीतून वाफ काढून घ्यावी. शेवपात्रात घालून चंवगे काढावेत. नारळाच्या दुधात गूळ व वेलदोड्याची पूड घालून रस करावा. शेवया बुडेपर्यंत रस घालून खावयास द्यावे.
X

Right Click

No right click