Designed & developed byDnyandeep Infotech

माघ

Parent Category: मराठी संस्कृती

 

महाशिवरात्री

माघ महिन्यातील अत्यंत महत्वाचा व पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्र, ही माघ महिन्यात वद्य चतुर्दशीला येते याबाबत एक कथा प्रचलीत आहे.
विंध्य पर्वताच्या घनदाट अरण्यात एक शिकारी राहत होता तो शिकार करून आपल्या बायको मुलांचे पालन पोषण करीत असे. एके दिवशी हरणांची शिकार करण्यासाठी व्याध एका झाडावर लपून बसला होता. झाडांच्या पानंमुळे काही दिसत नव्हते म्हणून तो एक एक पान तोडून खाली टाकू लागला आणि योगायोग असा की त्या झाडाखाली शिवाचे मंदिर होते व ते झाड बेलाचे होते.रात्री एक हरिणी पाणी पिण्यासाठी तिथे आली व्याधाला तिची चाहूल लागली.

व्याध बाण सोडणार तितक्यात त्या हरिणीचे लक्ष त्या शिकाऱ्याकडे गेले व ती त्याला म्हणाली अरे व्याधा जरा थांब! मला मारू नकोस कारण माझी पाडसे घरी वाट पाहत असतील त्यांची भेट घेऊन येते मग मार. त्या शिकाऱ्याने तिचे म्हणणे कबूल केले. व्याधाला दया आली त्याने तो विचार सोडून दिला. त्या दिवशी व्याधा कडून शिवाला बेलाच्या पानांचा अभिषेक झाला होता, शिकार न मिळाल्यामुळे उपवास घडला होता. यामुळे त्याने दाखविलेल्या दयेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व व्याधाला हरिणीला बछड्यासह त्यांनी स्वर्गात स्थान दिले म्हणून हा दिवस महाशिवरात्र म्हणून मानण्यात येऊ लागला.

आजही तो व्याध आणि कळपांच्या म्होरक्या मृग हे नक्षत्राच्या रूपाने आकाशात रात्री चमकताना दिसतात.

साडे तीन मुहूर्त
वर्ष प्रतिपदा
अक्षय तृतीया (अर्धा मुहूर्त)
विजयादशमी
बलिप्रतिपदा
वसंत पंचमी

माघ शुध्द पंचमीला वसंत पंचमी म्हणतात. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. या वेळी थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते. निसर्ग वसंतऋतू सोळा कलांनी फुलून वबहरून येतो. उत्तर भारतात व राजस्थानात हा सण उत्साहाने साजरा करतात. निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचा समन्वय भावमिलन व सुरेख संगम म्हणजे वसंत ऋतू होय.

वसंत पंचमीला नवीन पिकांच्या आेंब्या घरातल्या देवाला अर्पण करतात, व मग नवान्न भक्षण करतात. सरस्वतीची जननी म्हणून या दिवशी तिची पूजा करतात. हाच लक्ष्मीचाही जन्मदिन मानतात त्यावरून या तिथीला श्रीपंचमीही म्हणतात.

X

Right Click

No right click