रक्षाबंधन - ५

Parent Category: मराठी साहित्य

सकाळी ६ वाजता सांगलीच्या पोलीस आयुक्ताना गृहमंत्र्याकडून सूचना आली कीं त्यानी महंमदच्या घरातील सर्व कुटुंबियांना स्पेशल जीपने पोलिस संरक्षणात दादरला शिवाजी पार्क जवळच्या हॉटेल शिवनेरी मध्ये पाठवावे, पोलिस आयुक्त स्वत: महंमदच्या घरी सव्वा सहा वाजता गेले. त्यांना बघून फाजल घाबरला. त्याला त्यानी समजावून सांगितले. सातपर्यंत तयार राहण्यास सांगितले. सात वाजता एका अतिवेगाने जाणार्‍याजीपने महंमदच्या कुटुंबियांना दादरला पाठवले.
संध्याकाळी चार वाजता जेव्हा फाजलने त्या हॉटेल मध्ये महंमद, मनोहर आणि मधुराला पाहिले तेव्हा त्याला आनंद झाला. पाकिस्तानी अतिरेक्याला आणि सर्व मुलांना पकडल्यानंतर ही सर्व घटना पोलिस आयुक्तानी गृहमंत्र्याना दिली. १५ ऑगस्टचे देशातील सर्व ठिकाणचे कार्यक्रम होईपर्यंत, म्हणजे सकाळी ११ पर्यंत या घटनेची वाच्यताही करायची नाही असे त्यांनी ठरवले आणि सकाळी ११ पासून सर्व चॅनल्सवर ही बातमी विशेष बातमी म्हणून दाखवली जात होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशनच्या एकूण ८ प्लॅटफॉर्मवर सकाळी ७.५५ ते ८.०५ या वेळेत येणार्‍या बोगीत आणि कुर्ला, ठाणे, अंधेरी व बोरिवली येथील त्यावेळी असणार्‍या प्रत्येकी चार बोगीत आणि कार्यालयात स्फोट घडवून आणण्याची अतिरेक्यांची योजना महंमदने उघडकीस आणून हजारो लोकांचे प्राण वाचवले म्हणून त्याचा भव्य सत्कार करण्याचे मुख्यमंत्र्यानी ठरवले होते. बॉंबस्फोटाच्या कटात सामील झालेल्या या महंमदला आपल्या शुध्द आणि नि:स्वार्थी जीवनाची कहाणी सांगून मनोहरने त्याला खर्‍याजीवनाचा मार्ग दाखवला आणि मधुराने त्याला राखी बांधून कर्तव्याची जाणीव करून दिली. म्हणून बाँब स्फोट होऊ शकले नाहीत. मनोहर आणि सौ. मधुरा यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचाही भव्य सत्कार करण्याचे घोषित केले जात होते. हजारो लोकांचे प्राण वाचवणार्‍याया तरूणांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या सत्कार समारंभात सामिल होण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता.
संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या तिघांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलिस आयुक्तांनीही पूर्ण गुप्तता पाळून बाँबस्फोटाच्या कटातील सर्वांना गजाआड केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. पोलिस आयुक्तानी सांगितले की मुलांच्या हातात जो रिमोट हा अतिरेकरी देणार होता, त्या प्रत्येक रिमोट मध्येही एक लहान बाँब होता आणि बटण दाबल्यावर बोगीतील बाँबचा स्फोट झाल्यानंतर एका सेकंदातच या बाँबचा स्फोट होऊन त्या मुलांच्या चिंधड्या होणार होत्या. कोणताही पुरावा मागे राहू नये म्हणून या सर्व मुलांचे अवयव स्फोटात जळून खाक होतील अशी योजना पाक अतिरेक्याने आखली होती. महंमदला आग्रह केल्यानंतर तो बोलायला उभा राहीला. मनोहर व मी बालपणीचे मित्र. सहा वर्षे आम्ही एकत्र खेळलो. त्यानंतर मनोहर व मधुरा परगावी गेले. त्यांनी त्यांचे शिक्षण पुरे कले आणि चांगल्या कामात स्वत:ला गुंतवून घेतले. मनोहरच्या आदिवासी भागातील कामाची माहिती ऐकून मी भारावून गेलो. दहा हजारांच्या आदिवासी जनतेच्या सुखासाठी धडपडणारा मनोहर कोठे आणि पाच हजार निरपराध लोकंाना बाँब स्फोटाने उडवून देणार्‍यामुलांत सामील होणारा मी कोठे ? जेंव्हा ताईने मला राखी बांधली तेव्हाच मला माझ्या कर्तव्याची जाणीव झाली. मला माझी लाज वाटू लागली. अर्धा तास बागेत बसलो. कांही सुचत नव्हते. शेवटी मनोहरच्या सुविचारानी मला ताळयावर आणले. सरळ मी मनोहरच्या घरी गेलो आणि माझा गुन्हा कबूल केला. एका आमदारासह तो मला पोलिस आयुक्तांच्याकडे घेऊन गेला आिण् मी त्यांना कटाची सर्व माहिती दिली. माझ्या मनांत अतिवाईट विचार होते, त्याबद्दल मला क्षमा करा. यापुढे मनोहरचा सहकारी म्हणून त्याच्या बरोबर आदिवासी भागात काम करण्यासाठी जाण्याचे मी ठरवले आहे. त्यानंतर सत्तेतील आणि विरोधी पक्षातील प्रत्येक पुढाऱ्याला बोलण्यास ५-५ मिनिटे दिली होती. सर्वांनीच त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. त्यानंतर मनोहरच्या कार्यासाठी एक कोटी रूपये मनोहरच्या खात्यात जमा होतील असे मुख्यमंत्र्यानी जाहीर केले आणि सभा संपली.

X

Right Click

No right click