वनवासी बंधूंचे गीत

Written by Suresh Ranade

कॊण आदि अन कॊण अनादि, आंम्ही भारतवासी हो । रक्त आमुचे एक असुनी, शहर गाव वनवासी हो । आम्ही भारतवासी हो ॥ ध्रृ ॥ राजमहलचा मोह सोडुनी दुर्गम रस्त्यावरी चाले । मऊ फुलांची शैय्या सोडुनी काट्यावरती पाय पडे । चित्रकूट आणि पंचवटीवर वनवासी जग प्रेम करे । शबरीची बोरे गोड मानुनी राम फिरे वनवासी हो । आम्ही भारतवासी हो ॥ १ ॥ ह्त्तीच्या हौद्यावर चढुनी रणांगणी दुर्गा ही लढी । दोन्ही हाती खड्ग घेऊनी शत्रुवरती चाल करी । नारायण दल विक्रम त्यांचा अजर अमर होऊन जगी । खड्गधारी हे वीर येथले शत्रूंची धुळधाण करी । मंगलगढची राणी दुर्गा गिरीजंगलची स्वामी हो । आम्ही भारतवासी हो ॥ २ ॥ परचक्राचे वादळ आले क्रूर पाशवी वृत्तीचे । वीर शिवाजीच्या शब्दाने तरुण निर्मिले भक्तीचे । सह्याद्रीची पुकार ऎकून सागर लाटा उसळी रे । मातृभूमीच्या या अभिमाने निर्भयतेचा ऊर भरे । छत्रपतींचे स्वराज्य रक्षण शपथ सर्वजण घेती हो । आम्ही भारतवासी हो ॥ ३ ॥ उपेक्षितांची सेवा करण्या गिरी जंगलचा मार्ग धरा । स्वजनांच्या भावना चेतवुन समरसता निर्माण करा । प्रलोभनाना मिटवुन सार्‍या राष्ट्रशक्ती जागृत करा । देश धर्म निष्ठेचा नारा संकटातही अटल रहा । भाषा इतक्या, वेश निराळे अंत:करणी एकी हो । आम्ही भारतवासी हो ॥ ४ ॥

Hits: 32