वाढदिवसाचे गीत

Written by Suresh Ranade

(आज गोकुळात रंग खेळतो हरी---- या गीताच्या चालीवर हे गीत सर्वानी टाळ्या वाजवत तालावर नाचत म्हणावे)

॥ गीत ॥

आज वाढदिवस तुझा, आनंद घरी ।
इच्छितो आम्ही तुला , स्वास्थ्य शंभरी ॥

मित्र मैत्रिणी तुझ्या, आप्त संगती ।
ताठ रहा जीवनात, सर्व पाठीशी ।

झेप घे, यशस्वी हो, स्वर्ग भूवरी ।
वन्दितो प्रभूस आम्ही, देई शंभरी ॥
एच.यू.कुलकर्णी

Hits: 42