Designed & developed byDnyandeep Infotech

म्हणी

Parent Category: ROOT
पी हळद हो गोरी - उतावळेपणा दाखविणे
बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर - दोनपैकी एक पर्याय निवडणे
मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही - प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे  -  प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे  -  अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
उंटावरचा शहाणा  -  मूर्ख सल्ला देणारा
अडला हरी गाढवाचे पाय धरी  -  अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
नाचता येईना अंगण वाकडे  -  स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
तेरड्याचा रंग तीन दिवस  -  एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
तोंड दाबून बुक्क्यांचा मार  -  विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
नावडतीचे मीठ अळणी  -  नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
नव्याचे नऊ दिवस  -  नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
दुष्काळात तेरावा महिना  -  संकटात अधिक भर
अंथरूण पाहून पाय पसरावे  -  ऎपत पाहून खर्च करवा
छत्तीसाचा आकडा  -  विरुद्ध मत असणे
एका हाताने टाळी वाजत नाही -  दोष दोन्हीकडे असतो
काखेत कळसा गावाला वळसा - वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
पालथ्या घड्यावर पाणी -  सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
वासरात लंगडी गाय शहाणी  - अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
रात्र थोडी सोंगे फार -  काम भरपूर, वेळ कमी
अति शहाणा त्याचा बैल रिकामा  - अति शहाणपणाने नुकसान होते
शेरास सव्वाशेर -  प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
नाकाचा बाल  - अत्यंत प्रिय व्यक्ती
पायीची वहाण पायी बरी - योग्यतेप्रमाणे वागवावे
नाकापेक्षा मोती जड होणे - डोईजड होणे
आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना  -  दोन्ही बाजूंनी अडचण
कामापुरता मामा - काम साधण्यापुरते गोड बोलणे
आधी पोटोबा मग विठोबा  -  अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
वरातीमागून घोडे - एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
पाण्यात राहून माशाशी वॆर  -  बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे?
गाढवाला गुळाची चव काय  -  अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
घोडामैदानजवळ असणे -  परीक्षा लवकरच होणे
डोंगर पोखरून उंदीर कढणे -  जास्त श्रम करून कमी फायदा होणे
भरंवशाच्या म्हशीला टोणगा -  पूर्ण निराशा करणे
खायला काळ भुईला भार  -  ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले  -  दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे
हपापाचा माल गपापा  -  लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ  -  आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
नाव मोठे लक्षण खोटे  -  कीर्ती मोठी पण कृती छोटी
कोल्हा काकडीला राजी -  लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही -  क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
उंटावरून शेळ्या हाकणे - आळस, हलगर्जीपणा करणे
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये  - एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
झाकली मूठ सव्वा लाखाची  -  दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
गर्जेल तो पडेल काय?  -  पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही  -  कष्टाशिवाय यश मिळत नाही
वारा पाहून पाठ फिरवावी  -  वातावरण पाहून वागावे
कुंपणानेच शेत खाणे  -  रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
दगडावरची रेघ -  कायमची गोष्ट
X

Right Click

No right click