स्वागतकक्ष
ज्ञानदीप फौंडेशन
ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन १८, ‘ज्ञानदीप’,शिल्प चिंतामणी हौसिंग सोसायटी |
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन व ज्ञान प्रसार करण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप एज्युकेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन , सांगली ही सार्वजनिक विश्वस्त संस्था २००५ मध्ये स्थापन करण्यात आली. संस्थेची मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा ( १९५०) अन्वये नोंदणी करण्यात आली असून नोंदणी क्रमांक ई-१५३०/सांगली हा आहे. |
उद्दिष्टे- |
|
मायमराठी - मराठी माऊली
माझी मराठी माऊली
सा-या जगाची सावली
घरी गं माझ्या आली
माझी मराठी माऊली ---- १
शालू सखूचा ल्यायिली
पैठणी बहिणाई आणिली
साऱ्या जगी देखणी
माझी मराठी माऊली ---- २
चोळी जनीच्या हाताची
जरी मुक्तीच्या काठाची
अंगी मऊ मखमली
माझी मराठी माऊली ---- ३
हार नाम्याने घातला
गजरा सावत्याने माळिला
पैंजण नाथा घाली
माझी मराठी माऊली ---- ४
चुडा तुक्याने भरविला
मुकुट ज्ञान्याने चढविला
सकला हाती धरी
माझी मराठी माऊली ---- ५
गजर करिती वारकरी
जमती विठूच्या नगरी
पंढरी खरी दुमदुमली
माझी मराठी माऊली ---- ६
माझी मराठी माऊली
गंगा ज्ञानाची जाहली
दिगंतरासि निघाली
माझी मराठी माऊली ---- ७
---कै सौ. शुभांगी रानडे